कुशल बना, करिअर घडवा

मानसी जोशी

भारतातील शिक्षित युवकांचा मोठा गट हा बेरोजगार राह त असल्याचे दिसून येते. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेची मागणी पूर्ण करण्यासाठी 2022 पर्यंत सुमारे 70 कोटी कुशल कामगारांची गरज भासणार आहे.

टीम लीज स्कील्स यूनिर्व्हसिर्टी अहमदाबाद
सिम्बायोसिस स्कील अँड ओपन युनिव्हर्सिटी, पुणे
हरियाना विश्‍वकर्मा स्किल्स युनिव्हर्सिटी, गुडगाव
सेकोम स्कील युनिव्हर्सिटी, कोलकता,
सेचुरियन युनिव्हर्सिटी भुवनेश्‍वर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्विझर्लंडमध्ये एक 16 वर्षीय युवक लोअर सेंकडरी स्कूलमध्ये तीन वर्ष घालवल्यानंतर तत्काळ आपल्या करिअरच्या मागे लागतो. त्यानंतर अप्पर सेंकेंडरी स्कूलमध्ये त्यांच्याकडे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (व्हिईटी) किंवा पदवी अभ्यासक्रमाकडे जाण्याचा पर्याय असतो. त्यापैकी दोन तृतियांश मंडळी हे कौशल्यात व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचा मार्ग निवडतात. या आधारावर औद्योगिक नोकरीत ते सामील होतात. ते आपल्या या व्होकेन्शल एज्युकेशन अँड ट्रेनिंगच्या पार्श्‍वभूमीवर उद्योग क्षेत्रात आघाडीची नोकरी मिळवतात.

दुसरीकडे भारतात युवक औपचारिक शिक्षणाची पदवी प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयात जाणे पसंत करतात. विद्यापीठातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या हातात पदवी असते; परंतु ही पदवी विषयासंबंधी शास्त्रीय माहिती देणारी असते. ते एखादे कौशल्य प्रशिक्षण नसते. अशा स्थितीत पदवीधारक असूनही उद्योगात काम करण्यास सक्षम समजले जात नाहीत. त्यांच्या बायोडेटावर मास्टर डिग्रीचा उल्लेख असतो खरा, मात्र कौशल्याच्या अभावामुळे ते बेरोजगार राहतात. भारतीय युवकांचा मोठा गट हा उच्च शिक्षित असूनही बेरोजगार राहात असल्याचे चित्र आहे. कारण ते नोकरीसाठी पात्र समजले जात नाही. अशा स्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला आपली मागणी पूर्ण करण्यासाठी 2022 पर्यंत भारताला सुमारे 70 कोटी कुशल कामगारांची गरज भासणार आहे.

इलेक्‍ट्रिकल्स स्कील्स : शिकवण्यात येणारे कौशल्य

यूजीसीने सर्व विद्यापीठात बी. व्होक आणि एम. व्होक कार्यक्रम राबवण्याची परवानगी दिली आहे. या कारणामुळे या क्षेत्रात युवकांची मागणी वाढत चालली आहे. बी.व्होक. कार्यक्रमाचा उद्देशच हा साधारणपणे युवकात साऊंड टेक्‍निकल नॉलेज आणि इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगच्या व्यावसायिक कौशल्य विकसित करणे असते. व्यावसायिक मॉड्युलमध्ये इंजिनिअरिंग विज्ञान, विद्युत सिद्धांत, विद्युत स्थापना, इलेक्‍ट्रॉनिक सिद्धांत, मोटर आणि ट्रान्सफर सिंगल फेज आणि थ्री फेज सर्किट, विद्युत कंट्रोल सर्किट, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर प्रोग्रॅमिंग आदींचा समावेश असतो. हे कौशल्य शिकताना विद्यार्थ्यांना उद्योगातील बेसिक ते जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण केली जाते.
संधी : बी.व्होक केल्यानंतर युवक ऑफिस मेंटेनन्स इलेक्‍ट्रिक्‍शयन, इलेक्‍ट्रिकल इन्स्टॉलेशन इलेक्‍ट्रिशियन, इलेक्‍ट्रिकल सर्व्हिस फिटर आणि सुपरवायजर यासारखे जॉब करू शकतो.

पॉलिमॅकेनिक स्कील्स :शिकवण्यात येणारे कौशल्य

मशिनिंग, टर्निंग, ग्रायडिंग, हॅंड स्कील्स, असेम्ब्ली, पेनामेटिक्‍स, न्यूमेटिक्‍स, प्रोग्रॅमिंग आणि ऑपरेशन आदी. पॉलिमेकॅनिकमध्ये कुशल युवक हे प्रॉडक्‍शन मशिनरी आणि उपकरणाचे काही पार्टस देखील इन्स्टॉल करू शकतात.
संधी : पॉलिमेकॅनिकमध्ये बी.व्होक, पदवीधारक अनेक प्रकारच्या पुनर्निर्माण कौशल्यात पारंगत असतात आणि ते संबंधित उद्योगात सहजपणे जबाबदारी पार पाडू शकतात.

सुतारकाम (कारपेंटरी स्कील्स) 

कारपेंटरीमध्ये बी.व्होक पदवीनुसार युवकांना कॅबिनेट तयार करणे, इंटरियर वुडवर्क आणि फर्निचर निर्मिती आदी कामांसाठी तयार केले जाते. कुशल युवक हे जर्मनी किंवा अन्य युरोपीय देशातून आलेल्या विविध अत्याधुनिक मशीनवर काम करतात आणि कौशल्य प्राप्त करतात. जागतिक पातळीवर फर्निचर आणि फिक्‍श्चर तयार करण्यास ते सक्षम होतात. हॅच लायनिंग, आर्कट्रेब्स, (खिडकी आणि दरवाजाचा साचा) स्कर्टिंग आदी तयार करणे आणि बसवणे, लाकडापासून छताचे डिझाइन तयार करणे, दरवाजे आणि खिडक्‍यांवर डिझाईन तयार करणे आणि त्याला फिट करणे, डोअर लायनिंग तयार करणे यांसारख्या सर्वच कामांमध्ये ते महारथ हासिल करतात.
संधी : जीवनशैलीतील बदलामुळे अत्याधुनिक वेल फर्निश्‍चड फ्लॅटची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इ-कॉमर्सच्या जगाने इनोव्हेटिव्ह फर्निचरसाठी मोठी बाजारपेठ तयार केली आहे. अशा स्थितीत युवा मंडळी स्वत:चे स्टार्टअप देखील सुरू करु शकतात.

ऑटोमेटिव्ह स्कील्स :

आटोमेटिव्ह म्हणजेच मोटारवाहन कौशल्य देखील बी.व्होकअंतर्गत युवकांना ऑटोमोबाईलचे सर्व तंत्र शिकवते. जसे की मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, सॉफ्टवेअर आणि सेफ्टी इंजिनिअरिंग अभ्यासक्रम. या शिक्षणचा वापर
मोटारसायकल निर्मितीमध्ये करता येतो. या अभ्यासक्रमात इंजिनसंदर्भातील माहिती देण्यापासून ते वाहनात नवनवीन संशोधन करण्याचे तंत्र शिकवण्यात येते.
संधी : कोणत्याही ऑटोमेटिव्ह वर्कशॉपमध्ये काम करणे, स्वत:चे ऑटो वर्कशॉप सुरू करणे हे मोटारवाहनमध्ये बी.व्होक पदवी घेणाऱ्यांसाठी आकर्षक पर्याय आहेत.

आयटी आणि नेटवर्किंग हार्डवेअर स्कील्स :

युवकांना माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण साधनांचे प्रशिक्षण मिळते. आयटी आणि नेटवर्किंगमध्ये कौशल्यात देखील बी.व्होकनुसार कॉम्प्युटरचा वापर करू शकतात. त्यात नेटवर्किंग कन्स्ट्रक्‍शन, नेटवर्कचा वापर आणि व्यवस्थापन त्यात हार्डवेअर (केबल टाकणे, हब, पूल, स्विच, राऊटर) टेलिकम्युनिकेशन प्रोटोकॉल आणि सॉफ्टवेअरची निवड आणि वापर, नेटवर्कचा उपयोग आणि वापर, वापरासंबंधीचे धोरण आदींचा समावेश असतो. एक नेटवर्क आर्किटेक्‍टमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी नेटवर्क सिस्टिम्स तयार करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे यासारखे कौशल्य अवगत असणे गरजेचे असते. या नेटवर्कमध्ये आपण लोकल एरिया नेटवर्क, वाइड एरिया नेटवर्कचा समावेश होतो. नेटवर्कचे काम किचकट असते आणि कंपनीकडे यासाठी कुशल इंजिनिअरची गरज भासते. तो तांत्रिक सल्लागार, माहिती आणि तंत्रज्ञानाचे अधिकारी यांच्याशी संलग्न राहून काम करू शकतो.
संधी : डिजिटायजेशन, माहिती तंत्रज्ञान, स्मार्ट शहरातील औद्योगिक कार्यप्रणालीचा वाढता विस्तार पाहता या क्षेत्रात कुशल युवकाची नितांत गरज आहे. तंत्रकुशल युवक हे नेटवर्क तज्ज्ञ, किंवा नेटवर्क सेवा टेक्‍निशियन, नेटवर्क व्यवस्थापक, नेटवर्क इंजिनिअर, नेटवर्क विश्‍लेषक, प्रोग्रॅमर, नेटवर्क प्रबंधक आणि नेटवर्क सोल्युशन आर्किटेक्‍ट होऊन व्यवस्थापन आणि संघटनात्मक गरजेनुसार नेटवर्क समाधानासाठी काम करण्याची संधी मिळवू शकतो.

बी.व्होक अभ्यासक्रम शिकवणारे विद्यापीठ

भारतीय स्कील डेव्हलपमेंट हे जयपूर स्विस ड्यूल सिस्टिम ऑफ स्कील्स एज्युकेशनवर काम करते. त्याची संकल्पना एक मशीन एक विद्यार्थी अशी आहे. देशातील एकमेव विद्यापीठ असे आहे की जे विविध कौशल्य क्षेत्रात सर्टिफिकेट, डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा, बॅचलर आणि मास्टर प्रोग्रॅम आणि पीएचडीसारखे कौशल्य विकास आधारित कार्यक्रम प्रदान करते. राजस्थान आयएलडी स्कील युनिव्हर्सिटी, जयपूर कौशल्य आधारित प्रोग्राम प्रदान करते. देशातील आणखी काही कौशल्य विद्यापीठ आहेत की जे बीटेक, बीबीए, बीसीए सारखे औपचारिक पाठ्यपुस्तकात कौशल्य विकास कार्यक्रम राबवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)