कुळधरण भागात पक्षी-प्राणी गणना 

पाणवठा पद्धतीचा अवलंब ः मचाण उभारुन पाहणी
खेड  – कर्जत तालुक्‍यात कुळधरण भागातील वनक्षेत्रात पक्षी, प्राण्यांची गणना मोहीम वन विभागाने राबवली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पाणवठा पद्धतीने ही गणना करण्यात आली. वन्यजीवांच्या अधिवासाचा अंदाज घेऊन त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने वन्यजीवांच्या हालचाली न्याहाळण्याची संधी वन्यजीव प्रेमी व अभ्यासकांना मिळाली. वन्यजीवांच्या हालचालींचा प्राथमिक अंदाज या गणनेदरम्यान आला. पूर्वी प्राण्यांच्या पायाच्या ठशानुसार प्राणीगणना केली जात होती.
उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळेपक्षी तसेच प्राण्यांना सहसा इतरत्र पाणी उपलब्ध होत नाही. वनक्षेत्रातील पाणवठ्यावर पाणी उपलब्ध करुन दिले जाते. त्यामुळे तेथे हमखास प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. त्याचा विचार करुन या मोहिमेत प्रत्येक बीटवर पाणवठ्याजवळ बांबूंचा वापर करुन झाडावर बसण्यासाठी मचाण उभारण्यात आले. त्यावर बसून वन कर्मचाऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या. यामध्ये वनरक्षक डी. के. धांडे, आर. एस. कोळी, जे. एम. दाभाडे, पी. इ. नजन प्राणी-पक्षी गणनेत सहभागी झाले होते.
रेहेकुरी विभागाचे वनक्षेत्रपाल बापूसाहेब येळे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात आला. बारडगाव बीटमध्ये तळवडी, कुळधरणमध्ये सांगळे वस्ती व वडगाव तनपुरा बीटमध्ये नांदगाव येथे वनरक्षक व मजूर असेकर्मचारी गणनेसाठी नियुक्‍त करण्यात आलेहोते.

पाणवठ्यानजीकच्या झाडावर मचाण बनवून त्यावरून सलग चोवीस तास प्राणी-पक्षी गणना करण्यात आली. पहिल्या दिवशी सकाळी नऊपासून दुसऱ्या दिवशी सकाळी नऊपर्यंत गणना झाली. कॅमेरा सेटअप करुन वन्यप्राण्यांचे चित्रीकरणही करण्यात आले. पाणवठ्यावर आलेल्या विविध प्राण्यांबरोबर चित्रबलाक, बगळेया पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
विठ्ठल घालमे, वनपरिमंडळ अधिकारी, कुळधरण.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)