कुल पाण्याची क्रेझ खेडोपाडी वाढली

बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत : प्रतिष्ठा, आरोग्यच्या कारणाने मागणी वाढली

जळोची – शहरातील विविध समारंभात दिसणारे थंड पाण्याची कुल क्रेझ आता ग्रामीण भागात ही वाढली आहे. वाढत्या उन्हासोबतच हा व्यवसाय आता तेजीत आला असून कुठे प्रतिष्ठा तर कुठे आरोग्य असे कारण पुढे सांगत बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. विशेषता: बारामती तालुक्‍यात सर्वच ठिकाणी नागरिक जारचा वापर करीत आहेत.

गेल्या वर्षभरापासून शहरासह ग्रामीण भागात बदलत्या काळानुसार नवीन तंत्राच्या सहाय्याने पाणी फिल्टर करून थंड केल्यावर 30 रुपयांमध्ये एक जार भरुन पाणी मिळत आहे. जारचे पाणी सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रत्येक गावात दिसत आहे. लग्न सोहळे, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रमासह शहरातील प्रत्येक दुकानात थंडगार जारचा पाणीपुरवठा होत आहे. शहरात दहा ते बारा जार वॉटरचे व्यवसाय आहेत. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयासह लहान-मोठे उद्योगधंदे करणाऱ्यांमध्ये देखील या जारची मागणी वाढली आहे. माफक दरात थंड पाणी मिळत असल्याने ग्रामीण भागातही आता जारचे पाणी वापरले जात आहे. काही वर्षापूर्वी पाण्याचाही व्यवसाय होऊ शकतो या गोष्टीवर कुणीहीची विश्‍वास नव्हता. मात्र, पाणीटंचाई आणि शुद्ध पाण्याची मागणी यामुळे या काही वर्षात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय जिल्ह्यात सर्वत्र फोफावला आहे. तसेच केवळ श्रीमंतांच्या हातात दिसणाऱ्या शुद्ध पाण्याचे जार आता गाव खेड्यापर्यंत पोहोचले गेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)