“कुली नं. 1’च्या रिमेकमध्ये वरूण धवन 

बॉलीवूडमधील कॉमेडी किंग गोविंदा याने त्याच्या सदाबहार कारकिर्दीत वरूण धवनचे वडिल डेविड धवन यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या दोघांच्या नंबर वन सीरिज चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच धमाल उडविली होती. यापैकी एक “कुली नं. 1′ आहे. आता या चित्रपटाचा रिमेक तयार करण्यात येत आहे.

डेविड धवन आता आपल्या नंबर वन सीरिजला पुन्हा आणु इच्छित आहेत. याचा प्रारंभ “कुली नं. 1’पासून होत आहे. यात गोविंदाच्या जागेवर वरूण धवन मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार असून चित्रपटाची नायिकाही लवकरच निश्‍चित होणार आहे. “कुली नं. 1′ चित्रपट 1995मध्ये प्रदर्शित झाला होता. यातील गाणे हिट ठरले होते आणि चित्रपटाला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच याचा रिमेक बनविण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, डेविड यांनी दिग्दर्शित केलेल्या “मै तेरा हीरो’ आणि “जुडवा 2′ या चित्रपटात वरूणने दमदार अभिनय साकारत यश मिळविले आहे. सध्या वरूण यशच्या शिखरावर असून त्याच्या आतापर्यत एकही चित्रपट फ्लॉप ठरलेला नाही. त्याच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कमाई केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)