कुलींग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट

सातारा -अनेक ठिकाणी कुलींग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. पर्यटनस्थळे तसेच तिर्थक्षेत्रे याठिकाणी असे प्रकार सर्रास सुरू आहेत.

सध्या अधिक मास असल्याने जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रे भाविकांनी गजबजली आहेत. याठिकाणी दूरदूरवरून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. दुर्गम भागात असलेल्या तिर्थक्षेत्रांवर भाविकांना पिण्याच्या पाणी व अन्य शितपेयांच्या बाटल्यांसाठी एमआरपी प्राईजपेक्षा जादा पैसे आकारले जात आहेत. यामध्ये प्रत्येक बिसलेरी बाटलीमागे दोन रुपये तर अन्य शितपेयांमागे पाच रुपयांपासून सात रुपयांप्रमाणे जादा दर आकारले जातात. याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. कोणत्याही कंपन्यांनी अशी सूट दिली नसताना संबंधित दुकानदार भाविकांची लूट करत आहेत. याबाबत संबंधित विभागही डोळे झाकून कोणतीही कारवाई करत नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच अन्य पर्यटनस्थळांवरही अशीच स्थिती आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)