कुलभूषण प्रकरणी कैफैच्या सडेतोड उत्तराने पाक ट्रोलरची बोलती बंद!

मुंबई : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर भारताच्या अनेक बड्या व्यक्तींनी आनंद व्यक्त केला. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनेही याबाबत भारताचे अभिनंदन केले. पण कैफच्या ट्‌वीटनंतर पाकिस्तानमधील अनेक ट्‌विटराईट्‌सने ट्रोल केले. मात्र मोहम्मद कैफनेही चोख प्रत्युत्तर देत त्यांचे तोंड बंद केले. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी दिला. या निर्णयानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली. आयसीजेच्या निर्णयानंतर मोहम्मद कैफने ट्‌वीट केले. भारताचे अभिनंदन, आंतरराष्ट्रीय न्यायालायाचे आभार. सत्याचा विजय झाला, असे कैफने ट्‌वीटमध्ये म्हटले. मोहम्मद कैफचे हे ट्‌वीट पाकिस्तानच्या एका ट्‌विपलच्या फारच मनाला लागले. आमीर अक्रम नावाच्या यूझरने कैफच्या ट्‌वीटवर प्रतिक्रिया देताना नावातून मोहम्मद शब्द हटवण्यास सांगितले. यावर कैफनेही चोख प्रत्युत्तर दिले. जर मी भारताच्या विजयाचे समर्थन केले तर मला माझ्या नावातून मोहम्मद हटवायला हवे? मला माझ्या नावावर अभिमान आहे. आमीरचा अर्थ आहे, जीवनात परिपूर्ण. तुलाही त्याची गरज आहे. मोहम्मद कैफने यानंतर आणखी एक ट्‌वीट करुन लिहिले की, कोणीही कोणत्या धर्माचा ठेकेदार नाही. ठेकेदारांचा कोणाच्याही नावावर कॉपीराईट नाही. भारत सर्वसमावेशक आणि सहिष्णू देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)