कुलभूषण जाधव यांच्या प्रकृतीबाबतची चिंता कायम

नवी दिल्ली  – कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्याने भारताला मोठाच दिलासा मिळाला. मात्र, जाधव यांच्या प्रकृतीबाबत भारताला वाटणारी चिंता अजूनही कायम आहे. ते वर्षभरापेक्षा अधिक काळापासून पाकिस्तानच्या कैदेत आहेत. त्यांचा ठावठिकाणा आणि आरोग्यविषयक स्थिती याबाबतची कुठलीच माहिती पाकिस्तानकडून देण्यात आलेली नाही. सरकारी सुत्रांच्या म्हणण्यानुसार प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचल्याने जाधव यांच्याबाबतची माहिती पुरवणे पाकिस्तानसाठी बंधनकारक आहे. जाधव यांच्याविरोधात योग्यप्रकारे खटला चालवला गेल्याचा पुरावा पाकिस्तानने देणे आवश्‍यक असल्याचेही सुत्रांनी सांगितले. पाकिस्तानने मागील वर्षी 3 मार्चला जाधव यांना अटक केली. बलुचिस्तान प्रांतात त्यांना पकडण्यात आल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तर जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आल्याच्या दाव्यावर भारत ठाम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)