कुलभूषण जाधव यांच्या घराबाहेरही फटाके फोडून आनंद साजरा

 

मुंबई-अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असा निकाल देत आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे. या निर्णयानंतर मुंबईसह संपूर्ण देशात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या निकालानंतर कुलभूषण जाधव यांच्या मुंबईतील घराबाहेरही फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या निर्णयानं कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला. आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी याबाबतचा निर्णय दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)