कुलदीप यादवची क्रमवारीत घसरण !

दुबई: भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यात दमदार खेळी करत आयसीसी रॅंकिंगमध्ये एका अंकांची उडी घेत पाचवे स्थान पटकावले आहे. तर दोन टी-20 सामन्यातून बाहेर रहाव लागल्याचा कुलदीप यादवला फटका बसला असून त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. गोलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये तो चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

कॉफी विथ करण या टीव्ही शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर लोकेश राहुलचे भारतीय संघातून तात्पूरत्या स्वरुपात निलंबन करण्यात आले होते. भारतीय संघात पुन्हा पुनरागमन झाल्यानंतर राहुलने दोन टी-20 सामन्यांमध्ये प्रत्येकी 47 आणि 50 धावा काढल्या. त्यामुळे ताज्या रॅंकिंगमध्ये त्याला एका अंकाचा फायदा झाला. तर गोलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये कुलदीप यादवची एका अंकाने घसरण झाली. कुलदीपला दोन टी-20 सामन्यांमध्ये आराम देण्यात आला होता. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान क्रमश: फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)