कुर्तवडी येथे ग्रामदेवतेचा उत्सव उत्साहात

वेल्हे- कुर्तवडी (ता. वेल्हे) येथील काळभैरवनाथ व वरदायिनी भंडारा उत्सव टाळ-मृदंगाच्या गजरात उत्साहात साजरा करण्यात आला. वरदायनी देवी शिवकालीन पुरानातील असून सातगावची मालकिन आहे. देवीचे मूळ ठाणे प्रतापगडच्या पायथ्याशी जावळी खोरे येथील आहे. दूसरे ठाणे रायगडाच्या पायथ्याशी काळनदी येथे असून वाळंजवरदायिनी या नावाने आहे. तसेच तिसरे ठाणे वेल्हे तालुक्‍यातील पानशेत धरण विभागातील कुर्तवडी गावात आहे.

गावामध्ये ग्रामदैवत भैरवनाथाचे राठ आहे. याच ग्रामदैवतांचा दरवर्षी भंडारा उत्सव आयोजित केला जातो. सकाळी देवाची पूजा व अभिषेक करण्यात आला. संध्याकाळी ह.भ.प. ठाकर महाराज यांचे प्रवचन झाले. काकडा आरती ह.भ.प. गोविंद महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच रात्री ह.भ.प. प्रमिला जावळकर, ह.भ.प. कीर्तनकार नवनाथ महाराज जावळकर यांचे कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे देवाचा जागर व पूजा करण्यात आली.

काल्याचे कीर्तन ह.भ.प. राम पासलकर यांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक सहभागी झाले होते. महिलांनी फुगड्या खेळून उत्सवाचा आनंद साजरा केला. यावेळी मनसेचे नेते संपत मोरे, संरपच नारायण कडू, संरपच दता कडू, कुर्तवडीचे सरपंच मधुकर कडू, उपसरपंच नारायण कडू, धनंजय कडू, रोहीदास कडू, पंकज कडू, संजय कडू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)