कुरूळी हद्दीतून पाचजणी बेपत्ता

पत्नी व तीन मुलींसह मेहुणीचा समावेश

वाकी-घरात कोणाला काही न सांगता पुणे – नाशिक महामार्गावरील कुरूळी (ता. खेड) गावच्या हद्दीतून गेल्या दहा दिवसांपासून पत्नी व तीन मुलींसह मेहुणी अशा एकूण पाचजणी एकाच दिवशी निघून गेल्या आहेत. त्या सर्व अद्याप बेपत्ता असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व पोलीस हवालदार सुभाष पवार यांनी दिली.
प्रेमनाथ तुकाराम रसाळ (वय 34, रा. डोंगर वस्ती, चिंबळी फाटा, मोई रोड, कुरुळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रेमनाथ यांची पत्नी मनीषा प्रेमनाथ रसाळ (वय 26), मुलगी श्रद्धा प्रेमनाथ रसाळ (वय 9), मुलगी सृष्टी प्रेमनाथ रसाळ (वय 5), मुलगी आरूषी प्रेमनाथ रसाळ (वय 4) व मेहुणी सरस्वती सुरेश जगताप (वय 22, सर्वजण रा. चिंबळी फाटा, कुरुळी, ता. खेड) अशी बेपत्ता झालेल्या एकूण पाच जणींची नावे आहेत. चाकण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रसाळ कुटुंबातील मनीषा, श्रद्धा, सृष्टी व आरोशी यांच्यासह प्रेमनाथ यांची मेहुणी सरस्वती हे सर्वजण कुरुळी येथे राहत होते. बुधवारी (दि. 14 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या सर्वजणी घरात कोणाला काही न सांगता एकाच दिवशी राहत्या घरातून निघून गेल्या आहेत. तेव्हापासून यातील कोणीच परत घरी आलेले नाही. गेल्या दहा दिवसांपासून त्यांचा शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागला नसल्याने ते बेपत्ता झाल्याची फिर्याद प्रेमनाथ रसाळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. या पाच जणींबद्दल कोणाला काही माहिती असल्यास अथवा कोठे आढळल्यास त्यांनी तातडीने चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क (02135 – 24933) साधण्याचे आवाहन पोलीस हवालदार सुभाष पवार व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केले आहे. कुरुळी येथून एकाच दिवशी पाचजणी बेपत्ता झाल्याने पंचक्रोशीत प्रचंड खळबळ उडाली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)