कुरूळीत महिलांसाठी स्वयंरोजगार शिबिर

चिंबळी – समाजात महिलांनी मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता पुढे येऊन शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीसमर्थच्या वैशाली सावंत यांनी कुरूळी येथे बोलताना केले. कुरूळी (ता. खेड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोग आराखडाअंतर्गत महिलांसाठी स्वयरोजगार प्रशिक्षण कोर्स श्रीसमर्थ जामखेड यांच्या वतीने आयोजित केला होता. या प्रशिक्षण शिबिरात टेलरिंग कोर्स, ब्युटीपार्लर, तसेच मोबाइल रिपेरिंग आदींचा समावेश आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य अमर काबंळे, भगवान पोखरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शातांराम सोनवणे, माजी उपसंरपच अमित मुऱ्हे, बाळासाहेब सोनवणे, उपसंरपच विद्या बागडे, सदस्या सुभद्रा सोनवणे, देवराम सोनवणे, शरद मुऱ्हे, पोलीस पाटील प्रतिभा कांबळे, ग्रामविकास अधिकारी छाया इरणक, प्रियंका सावंत, सुनील चोपडे, अनिल डोंगरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ आणि महिलावर्ग उपस्थित होते या उपक्रमात 75 महिला सहभागी असून हे प्रशिक्षण पंधरा दिवसांचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)