कुरूळीत बाळासाहेब बागडेंनी जोपासली बांधिलकी

चिबंळी- कुरूळी (ता. खेड) येथील माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब ज्ञानोबा बागडे यांनी गेल्या वीस वर्षांपासून दीपावलीनिमित्त पाडवा तसेच महालक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई व कपडे वाटप करण्यात आले. बागडे यांनी समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. हे कार्य ते वीस वर्ष करीत आहे. त्यांनी या उपक्रमांतून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा बागडे, उद्योजक अनिल ज्ञानोबा बागडे, रामदास बागडे, माजी चेअरमन अनिल बागडे, हुतात्मा राजगुरु पत्रकार संघाचे समन्वयक प्रमुख सुनील बटवाल, युवा उद्योजक निलेश बागडे, सावता शिंदे, मनोज बागडे, महिला आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)