कुरुळी शाळेत पालकसंघाची सभा खेळीमेळीत

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या व शाळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली माता पालक व शिक्षक पालकसंघाची तिसरी सभा खेळीमेळीच्या वातावरण पार पडली, असल्याचे मुख्याध्यापिका शोभा यांनी सांगतिले. कुरुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या व शाळा समितीच्या वतीने उपसरपंच विद्या बांगडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या माता पालक व शिक्षकसंघ बैठकीत मुलांची सतत गैरहजेरीचे प्रमाण कमी करणे, मुले व मुलींच्या सुरक्षितते विषयी पालकांमध्ये जनजागृती करणे, मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेची पालकांना माहिती देणे व मुलांना मिळणाऱ्या शिष्यवत्तीची माहिती देण्यात आली. तसेच शुक्रवारी (दि. 12) मोफत नेत्र शिबीर होणार असल्याचे यावेळी पालकांना सांगण्यात आले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, माता पालक संघाच्या सदस्य कविता सोनवणे, किशोर बागडे, संतोष घाडगे, निर्मला खेडकर, निर्मला दिवटे, माया जाधव, सुवर्णा वाघमारे व सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)