कुरुळी शाळेत उन्हाळी शिबिराचा शुभारंभ

चिंबळी- कुरूळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत मुलींसाठी खास महिंद्रा ऍन्ड महिंद्रा कपंनीच्या वतीने नन्ही कली उपक्रमांतर्गत आयोजित उन्हाळी शिबिराचा आज (सोमवारी) शुभारंभ करण्यात आल्याचे मुख्याध्यापक शोभा सुतार सांगितले. हे शिबिर मंगळवार (दि. 15 मे) पर्यंत चालणार आहे. यात मुलींना कला, नृत्य, क्राफ्ट, विविध मनोरंजनाच्या खेळातून शिक्षण दिले जाणार असल्याने त्यामुळे मुलींचा शैक्षणिक विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी सरपंच चंद्रकांत बधाले, उपसंरपच विद्या बागडे, माजी उपसंरपच अमित मुऱ्हे, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बधाले, उपअध्यक्ष नवनाथ मेमाणे व सर्व शिक्षकवृंद तसेच नन्ही कलीच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)