कुरुळी शाळेचा “प्रेरणादायी’ने सन्मान

चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला प्रेरणादायी, तर शाळेतील वर्ग शिक्षिका निर्मला खेडकर यांना शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पंचायत समिती खेड व शिक्षण विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने तालुक्‍यातील गुणवंत शिक्षक,शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक,व प्रेरणादायी शाळा पुरस्कार, वितरण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते निर्मला खेडकर यांना तर शाळेचा प्रेरणादायी पुरस्कार मुख्याध्याकिा शोभा सुतार यांनी स्वीकारला. निर्मला खेडकर व शाळेला पुरस्काराने गौरविण्यात आल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे, तंटामुक्‍ती समितीचे माजी अध्यक्ष एम. के. सोनवणे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच सुभद्रा सोनवणे, आदर्श सरपंच चंद्रकांत बधाले, विद्या बागडे, उपाध्यक्ष नवनाथ मेमाणे, हेमंत काळडोके, बाळासाहेब बागडे, नितिन गायकवाड, मारूती मुऱ्हे, शांताराम घाडगे, सुरेश गायकवाड, संजिवनी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या अनिता बधाले व सर्व शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)