कुरुळी येथे शैक्षणिक गटसंमेलन उत्साहात

चिंबळी- कुरुळी केंद्राच्या केंद्रप्रमुख अंजली सुभाष मेदनकर यांचा सेवापूर्ती, कृतज्ञता समारंभ व शैक्षणिक गटसंमेलन कुरुळी येथे येथे उत्साहात पार पडले, अशी माहिती शोभा सुतार यांनी दिली. ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात 33वर्ष सेवा करणाऱ्या केंद्रप्रमुख अंजली मेदनकर यांना केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने शाल, श्रीफळ,सुवर्ण मुद्रिका व गौरवचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शातांराम सोनवणे, कुरुळी गावचे सरपंच चंद्रकांत बधाले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विलास कातोरे, कुरुळीचे उपसरपंच अमित मुऱ्हे, देवराम सोनवणे, शरद मुऱ्हे, बाळासाहेब बधाले, एम. के. सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सोनवणे, सदस्या अनिता बधाले, शांताराम नाणेकर गुरुजी, शाळा समिती चाकणचे अध्यक्ष लक्ष्मण नाणेकर, शाळा व्यवस्थापन समिती कुरुळीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष गौतम कांबळे, केंद्र प्रमुख सुरेश कातोरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष विठ्ठल तांबे, वात्सल्य मंगल कार्यलयाचे मालक बाळासाहेब मुऱ्हे, संजय कड यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थितीत होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार वाटेकर तर अरुण गायकवाड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup: Thumbs up
13 :heart: Love
14 :joy: Joy
13 :heart_eyes: Awesome
13 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)