कुरुळी येथील बाळासाहेब कड यांच्या सर्जा-राजा बैलजोडीचे जोरदार स्वागत

चिंबळी-जगद्‌गुरू संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांच्या 333व्या पालखी सोहळ्याच्या रथासाठी बैलजोडीचा मान खेड तालुक्‍यातील कुरुळी (ता. खेड) येथील प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध गाडामालक बाळासाहेब सोपानराव कड यांच्या सर्जा-राजा या बैलजोडीला मिळाला असल्याने त्यांच्या या बैलजोडीचे संपूर्ण खेड तालुक्‍यात जोरदार स्वागत होत आहे.
बाळासाहेब कड हे गेली वर्षभर आपल्या बैलजोडीलाच संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा पालखीचा रथ ओढण्याची संधी मिळावी, यासाठी खूप प्रयत्नशील होते. परप्रांतात प्रत्यक्षात जाऊन त्यांनी सुंदर अशा बैल जोड्या खरेदी करून घरी आणल्या. पालखी सोहळा संस्थानच्या वतीने बैल जोडीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, चाल आणि रथ ओढण्याची क्षमता आदींची पाहणी करून विविध निकषांनुसार कड यांच्या सर्जा – राजा या बैल जोडीचा पारदर्शीपणा दिसून आला. त्यामुळे त्यांच्या या बैल जोडीची निवड करण्यात आल्याचे पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोधर मोरे व विश्वस्त अभिजित मोरे यांनी जाहीर केले. पालखीचा रथ ओढण्याचा मान बाळासाहेब कड यांच्या बैलजोडीला मिळाल्याने त्यांच्या बैल जोडीसह त्यांच्यावर या भागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे, खराबवाडीचे सरपंच जीवन खराबी, उद्योगपती मोहन खराबी, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या खेड तालुका प्रमुख नंदाताई कड, खालुंब्रे गावच्या माजी सरपंच सोनल बोत्रे, एड. प्रीतम शिंदे आदीनी प्रत्यक्षात कड यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले आहे.

  • …म्हणून सर्जा-राजाची निवड
    सर्जा – राजा ही बैलजोडी कर्नाटक येथून खरेदी करून आणली आहे. या बैल जोडीचा रंग पांढरा शुभ्र असून, त्या जोडीचे वय अवघे चार वर्षे आहे. या जोडीत वजन वाहण्याची उत्तम क्षमता असल्याने या बैलजोडीची विशेष निवड करण्यात आली आहे.
  • संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान माझ्या सर्जा – राजा या बैलजोडीला मिळाला, याबद्दल मी धन्य झालो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनात असलेले स्वप्न सत्यात उतरल्याने आणि आम्हाला ही संधी मिळाल्याने आम्ही खूप आनंदित आहोत.
    बाळासाहेब कड,. बैलजोडीचे मालक
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)