कुरुळी, मुऱ्हेवस्ती शाळेत “अस्मिता’ सुरू

चिंबळी – खेड तालुक्‍यातील कुरूळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत तसेच मुऱ्हेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अमिस्ता योजना योजना सुरू केले असल्याचे मुख्याध्यापिका शोभा सुतार यांनी सांगितले. यावेळी सरपंच चंद्रकांत बधाले, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, उपसंरपच विद्या बागडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सोनवणे, सचिन कड, विजय काबंळे, अमित मुऱ्हे, शरद मुऱ्हे, ग्रामविकास अधिकारी छाया इरणक आदि मान्यवरांसह सर्व शिक्षिक उपस्थित होते. सॅनिटरी पॅडचा वापर युवतीच्या आरोग्यसाठी लाभदायक असल्याचे सिध्द झाले असूनही बहुतांश कुटूंबाच्या आवाक्‍यात बसत आहे, त्यामुळे अवघ्या पाच रूपायांत व स्थानिक महिला बचत गटाच्या मदतीने शाळा किंवा घराजवळ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, त्यामुळे अस्मिता योजनेमुळे तळागाळातील युवतीपर्यंत मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबद्दल जागृती होइल, असा विश्‍वास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्‍त केला असल्याचे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)