कुरुळी फाट्यावर डंपर उलटला

चिंबळी- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कुरुळी फाटा (ता. खेड) येथे डंपर पलटी झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवशांना त्रास सहन करावा लागला. आज (सोमवार) पहाटे सहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून एक डंपर राखे सारखा पदार्थ घेऊन चाकण बाजूने भोसरीकडे निघाला होता.

त्यावेळी अचानक विरूद्ध दिशेने एक रिक्षा आल्याने डंपर चालकाने अर्जंट ब्रेक दाबल्याने कुरुळी फाटा येथील मुख्य चौकात तो उलटल्याने संपूर्ण रस्त्यावर राखच राख झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)