कुरुळी परिसरात नवरात्रोत्सवाची लगबग

दुर्गा मातेच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न

चिंबळी-गणेशोत्सवानंतर आता शहरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या पितृपंधरवडा सुरू असून दुर्गा मातेची मूर्ती बनविण्यासाठी कुरुळी (ता. खेड) परिसरात दुर्गामातेच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न आहेत.
परंपरेनुसार गणेशोत्सव झाल्यानंतर पितृपंधरवड्यास सुरुवात होते. याच दिवसात नवरात्रोत्सवासाठी दुर्गा मातेची मूर्ती बनविण्यास सुरुवात केली जाते. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमधून देवीची स्थापना तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. अवघ्या नऊ दिवसांवर नवरात्रोत्सव आल्याने सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 5) घटस्थापना झाल्यानंतर नवत्रोत्सवाची धूम सुरू होणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्याप्रमाणे विविध प्रकारातील गणेश मूर्ती असतात त्यामुळे दरवर्षी गणेश मूर्ती तयार कराव्या लागतात. मात्र, दुर्गा मातेची मूर्ती एकच असल्याने बहुतांश सार्वजनिक मंडळानी फायबरच्या मूर्ती तयार केलेल्या आहे. त्यामुळे मूर्ती ज्या मंदिरात ठेवल्या जातात त्या मंदिराची स्वच्छता आणि रंगरगोटी करण्यात येत आहे. दांडियाचा विस्तार वेगाने ग्रामीण भागात झाल्यामुळे नवरात्रोत्सवाला विस्तारित स्वरूप प्राप्त झाले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)