कुरुळी परिसरात कांदा खुरपणीला सुरुवात

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरूळी परिसरात कांदा खुरापणीच्या कामाला सुरुवात झाली आहे; परंतु मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. कुरूळी, मोई, निघोजे, चिंबळी, केळगांव, माजगांव, सोळू, धानोरे, गोलेगाव, मरकळ, मोशी, डुडूळगांव, चऱ्होली खुर्द परिसरात शेतकऱ्यांनी गेल्या एक-दीड महिन्यापूर्वी हंगामातील खरीप हंगामातील कांदा लागवड करण्यात आली होती. आता या पिकाची खुरापणी सुरू केली आहे. मात्र परतीचा पाऊस झाला नसल्याने आणि उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने जमिनीतील आर्द्रता कमी झाली आहे. यामुळे कांदा पिकाच्या खुरपणीला वेळ लागत आहे. याबरोबर शेतमजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकऱ्यांना खुरपणीचे काम स्वतःच करावे लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)