कुरुळी जिल्हा परिषद शाळा दोन सत्रात

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील आणि औद्योगिक क्षेत्रातील, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील कुरूळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वर्ग खोल्या अपूर्ण पडत असल्यामुळे दोन सत्रात शाळा भरविण्यात येणार असल्याचे शाळा समितीचे अध्यक्ष चंदकात सोनवणे यांनी सांगतिले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या व व्यवस्थापन समितीच्या वतीने 18-19 या वर्षासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी या विषयावर चर्चा करण्यात आली. याचबरोबर विद्यार्थ्यांना रोज शिकवला जाणारा अभ्यास आता व्हॉट्‌सऍपवरून पालकांना कळवण्यात येणार असल्याने सर्व पालकांचे मोबाइल नंबरही घेण्यात आले आहेत. यावेळी जून महिन्यात बदलून गेलेल्या आणि नवीन आलेल्या सर्व शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक विषयावर पालकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले आणि सर्व मुलींना, तसेच अनुसूचित गटातील मुलांना गणेश वाटप करण्यासाठी ठराव घेण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका शोभा सुतार, शाळा समितीचे अध्यक्ष चंदकात सोनावणे, उपाअध्यक्ष किशोर बांगडे, माजी सरपंच एम. के. सोनवणे, उपसंरपच विद्या बांगडे, सर्व संचालक आणि शिक्षक उपस्थित होते

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)