कुरुळी-चिंबळी फाट्यावर दोन तास कोंडी

चिंबळी – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरूळी व चिंबळीफाटा येथे आज (बुधवारी) झालेल्या वाहतूक कोंडीने सुमारे दोन ते तीन किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच विरूद्ध दिशेने जाण्याऱ्या वाहनांमुळे कोंडीत अधिकच भर पडत होती. तर या कोंडीत दोन रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णाचेही हाल झाले. पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध व जड मालवाहू वाहनांची वर्दळ वाढली असल्याने कुरूळीफाटा, चिंबळीफाटा येथे सिग्नल बसवावा, अशी मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याची खंत परिसरातील प्रवासी व ग्रामस्थ व्यक्‍त करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)