कुरुळी, चिंबळी परिसरात नारायणपूर दिंडीचे स्वागत

दत्तजयंतीनिमित्त सोहाळा : दर्शनासाठी नागरिकांची गर्दी

चिंबळी- दत्तजंयतीनिमित्त विश्‍वचैतन्य सद्‌गुरू नारायण महाराज श्रीक्षेत्र नारायणपूर यांच्या कृपाआशिर्वादाने संगमनेर-अकोले ते श्रीक्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळा कुरुळी, चिंबळी मार्गे नारायणपूरकडे निघाला आहे. दरम्यान, या सोहळ्याचे या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी स्वागत करीत पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.
हा सोहळा चिंबळी, कुरुळी परिसरात येताच खेड तालुका कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, माजी आदर्श सरपंच चंद्रकांत बधाले, तंटामुक्‍ती समितीचे माजी अध्यक्ष एम. के. सोनवणे, उपसरपंच सुभद्रा सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल आदि मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. गेल्या आठरा वर्षांपासून राजू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा सुरू आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये सुमारे एक हजारापेक्षा अधिक वारकरी सहभागी होत असतात. या सोहळ्याती वारकऱ्यांना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे यांच्या वतीने अल्पोपहार चहा, नाष्टाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी हभप भागवताचार्य बाबा खामकर यांनी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या जिवनपर आधारित प्रवचन आयोजित करण्यात आले. याप्रसंगी बाळकृष्ण दातीर, विश्‍वास पवार, राजेंद्र देशमुख, चंद्रभान तांबे, संजय गुंजाळ तर चिंबळी येथील हॉटेल संकेतच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पांडुरंग जैद व सामाजिक कार्यकर्ते अरूण जैद यांच्यावतीने चहा, नाष्टा, व पाणी बॉटल वाटप करण्यात आले. याप्रसंगी गणेश जाधव, लक्ष्मण सोनवणे, अर्जुन कातोरे, ज्ञानेश्‍वर कड, अर्जुन अवघडे, संतोष कातोरे, पोपट चव्हाण आदि मान्यवरांसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)