कुरुळी, चिंबळीत 2650 बालकांना “दो बुंद जिंदगीके’

  • डॉ. एस. एस. ढेकळे : करंजविहरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने 91 ठिकाणी सोय

चिंबळी – कंरजविहरे प्राथमिक आरोग्य केंद्र अतर्गंत चिंबळी व कुरुळी (ता. खेड) येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या वतीने 0 ते 5 वर्षे वयोगटातील सुमारे 2650 बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आला, अशी माहिती कंरजविहरे प्राथमिक केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. एस. ढेकळे यांनी दिली.
करंजविहरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अतंर्गत 91 ठिकाणी लस देण्यासाठी सोय उपलब्ध केली असून जवळपास 22 हजार लाभार्थ्यांना डोस देण्यात येणार असून 280 कर्मचारी बुथवर नियुक्‍ती केली असून नागरिकांच्या सहकाऱ्याने या पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 11 मार्च रोजीही यशस्वी करण्यात येणार असल्याचे वैद्याकिय अधिकरी डॉ. एस. एस. ढेकळे यांनी चिंबळी येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ केली त्यावेळी त्यांनी सांगितले. चिंबळी उपआरोग्य केंद्रा अंतर्गत एकूण 850 बालकांना डोस देण्यात आला.
यावेळी आरोग्यसेविका टी. के. वालकोटी, पी. पी. गायकवाड, आशा स्वयसेविका अनिता लोखंडे, मदतनिस प्रतिक्षा गजेंसिह आदि मान्यवर त्याचप्रमाणे कुरूळी येथे प्राथमिक उपआरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ सरपंच चंद्रकांत बधाले व ग्रामपंचायतीचे सदस्य बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कंरजविहरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी एस. एस. ढेकळे व सर्व सदस्य उपस्थित होते. प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या वतिने मुऱ्हेवसती, बागडेवस्ती, सोनवणे वस्ती, चिंबळीफाटा व कुरूळी गावठाण प्राथमिक उपआरोग्य केंद्र असा पाच ठिकाणी बुथ लावण्यात आले होते. या सर्व ठिकाणी एकूण 1800 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आले असल्याचे आरोग्य सेविका एन. एन. तापकीर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)