कुरुळी, चिंबळीत महामानवास अभिवादन

चिंबळी- कुरूळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका शोभा सुतार यांनी सांगितले. तर चिंबळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या 127 व्या जंयती निमित्त सरपंच रेश्‍मा सोनवणे यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून पूजा करण्यात आली. याप्रसंगी हनुमंत बर्गे, संतोष सोनवणे, भरत जैद, अशोक महार्गे, राजू बहिरट, शालन पाटोळे आदि मान्यवर उपस्थित होते. तर कुरूळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत मुख्याध्यापिका शोभा सुतार व सर्व शिक्षिकांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार व श्रीफळ अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी आंबेडकर यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगत व्यक्‍त केले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)