कुरुळी केंद्राचा क्रीडा महोत्सव उत्साहात

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) केंद्राचा केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव चाकण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उत्साहात पार पडल्याचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे उद्‌घाटन केंद्र प्रमुख हिरामण कुसाळकर, शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालकांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, खेळाडुंनी शपथ घेतल्यानंतर धावणे, धावती उंच उडी, धावती लांब उडी, गोळा फेक, चेंडू फेक, वक्‍तृत्व आदी वैयक्तिक स्पर्धेबरोबर खो-खो, कबड्डी, लंगडी, लेझीम, भजन, लोकनृत्य आदी सांघिक स्पर्धांचे लहान -मोठा गटानुसार या स्पर्धा खेळल्या गेल्या. सर्व विजेत्या खेळाडुंना व संघांना, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार चषक व प्रशस्तिपत्रक कै. विठोबा रमाजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे कुरुळी गावातील गुलाबराव सोनवणे-पाटील, फडकेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड, सद्‌गुरुनगर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वेताळ यांना कुरुळी केंद्राच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर बक्षीस वितरण समारंभ खेड तालुका कुस्ती परिषदेचे युवा अध्यक्ष तथा उद्योजक पै. विशाल सोनवणे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय शिवले व तुकाराम वाटेकर तर संदिप नाणेकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)