कुरुळीतील महावितरणचा खांब अपघाताला निमंत्रण देणारा

चिंबळी- कुरूळी गावठाण हद्दीत निघोजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावितरणाचा खांब धोकादायक ठरत असल्याने रात्रीच्यावेळी अपघात होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली असून याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कुरुळी गावातील निघोजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य चौकात दोन्ही बाजूने रहदारी असून हा रस्ता अरुंद चारचाकी मालवाहू गाड्यांची सतत ये-जा सुरू असते त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून हा खांब त्वरीत काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)