कुरुळीतील किर्तन महोत्सवाची सांगता

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) येथे खेड तालुका वारकरी साप्रंदाय व परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय किर्तन महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. या किर्तन महोत्सवात बाबासाहेब इंगळे. केसवाला उखळीकर, सुप्रिया साठे, भरत थोरात, ज्ञानागेश्‍वर जळकीकर, बाळू गिरगावंकर या महाराजांची किर्तन सेवा या तीन दिवसात पार पडली. यामध्ये सुप्रिया साठे किर्तनसेवे प्रसंगी म्हणाल्या की, आपण ज्या भूमित राहत आहात ती संतांची भूमी आहे, म्हणून आपण संताचे नामस्मरण व करून संतांना शरण जाऊन परमात्मा केला पाहिजे, असे मत त्यांनी वक्‍त केले. याप्रसंगी विनोद महाळुंकर, तुकाराम गवारे, बाळासाहेब मुऱ्हे, विकास ठाकूर, बापू मेदनकर, संजय पवार, गुलाब सोनवणे, सागर मुऱ्हे, आशिष मुऱ्हे, भरत कड, साखचंद लोखंडे, बापू मेदनक, मुक्‍ताजी नाणेकर, हिरामण येळवंडे, निलेश बागडे, विलास कातोरे, पांडुरंग बनकर, अमृत शेवकरी, प्रकाश पोटवडे आदि मान्यवरांसह महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)