कुरुळीतील अंगणवाडी बालकांना खाऊ वाटप

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) येथील अंगणवाडील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले असल्याचे अंगणवाडी सेविका अनिता बागडे यांनी सांगतिले. खेड तालुका पंचायत समितीचे कुरुळी बिट मधील कुरुळी गावठाण हद्दीतील अंगणवाडीमध्ये कुपोषित बालकांना व्हीसीडी सप्ताहांतर्गत सरपंच बाळासाहेब सोनवणे, तंटामुक्‍ती समितीचे माजी अध्यक्ष गुलाब सोनवणे यांच्या हस्ते गुडदाणी, लाडू, शेंगदाणे, मुरमुरे आदि पदार्थ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, उपाध्यक्ष संतोष घाडगे, किशोर बागडे, माजी सरपंच शरद मुऱ्हे, तंटामुक्‍ती समितीचे माजी अध्यक्ष एम. के. सोनवणे, अमित मुऱ्हे, देवराम सोनवणे, ग्रामसेविका छाया इरणक आदि मान्यवरांसह सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)