कुरुळीच्या सरपंचपदी बाळासाहेब साहेबराव सोनवणे

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) ग्रामपंचायत सरपंचपदी बाळासाहेब साहेबराव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन चासकर यांनी सांगतिले.
कुरुळी येथील ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून सरपंच चंद्रकांत बधाले यांनी स्वखुशीने सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्‍त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी चेतन चासकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी बाळासाहेब साहेबराव सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी तलाठी मनोज जाधव, ग्रामविकास अधिकारी छाया इरणक, मावळते सरपंच चंद्रकांत बधाले, उपसरपंच विद्या बागडे, देवराम सोनवणे, शरद मुऱ्हे, सचिन कड, विजय कांबळे, अमित मुऱ्हे, शुभांगी कांबळे, सुनंदा बागडे, नगिना मेदनकर, सुभद्रा सोनवणे, प्रज्ञा गुरव, अनिता बधाले, पोलीस पाटील प्रतिभा कांबळे उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर ग्रामपंचायत कार्यालय समोरुन भैरवनाथ मंदिर तसेच गावात संगीत वाद्याच्या गजरात व भंडाऱ्याची उधळून करीत मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी अध्यक्ष मंगलदास बांदल, एकनाथ सोनवणे, एम. के. सोनवणे, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, संभाजी सोनवणे, भरत कड, संजय मुऱ्हे, शिवाजी सोनवणे, मल्हारी बागडे, मोहन गायकवाड, गुलाब कांबळे, विकास मुऱ्हे, निवृत्ती घाडगे आदि मान्यवरांसह सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)