कुरवली शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था

कुरवली- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांची कुंचबणा होत असून त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
कुरवली येथील प्राथमिक शाळेची 7 डिसेंबर 1918 मध्ये सुरुवात झाली. या शाळेला केंद्र शाळेचा दर्जा मिळाला असून केंद्र शाळा अंतर्गत परिसरातील तावशी, उद्घट, जांब, मानकरवाडी, चिखली, कळंब आदी गावातील व वाडीवस्तीवर जिल्हा परिषदच्या 16, खासगी 4 व माध्यमिक 4 शाळांचा समावेश आहे. या शाळांमधून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. ज्ञानरचना वादावर आधारित आधुनिक डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थी वाढीसाठी गणवेश, शालेय पोषण आहार, भौतिक सुविधा देण्यात येत असल्याने जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थी संख्यामध्ये वाढ होत आहे. कुरवली जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ली 4 थी पर्यंतचे वर्ग सुरू असून त्यामध्ये 74 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत गुणवत्ता वाढीसाठी शालेय व सहशालेय उपक्रम, मासिक सभा, बाल सभा, सुंदर हस्ताक्षर, पाढे, पाठांतर, संख्येच्या आधारे उपक्रम आदी उपक्रमातून शैक्षणिक कामकाज एक मुख्याध्यापिकेसह सहशिक्षिकेच्या माध्यमातून केले जाते.
दरम्यान, रस्त्यालगत शाळा असल्याने शाळेसाठी संरक्षक भिंतीची आवश्‍यकता असून शौचालयाची दुरवस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यासाठी दुरूस्तीची आवश्‍यकता असून जिल्हा परिषदकडे यासाठी प्रस्ताव दिल्याचे शिक्षकांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)