कुरवली, कळंब, वालचंदनगरात वरुणराजा बरसले

कुरवली- कुरवलीसह वालचंदनगर, कळंब, जांब, उद्घट, तावशी चिखली, मानकरवाडी परिसरातील भागात मध्यरात्री झालेल्या मूर पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर वरुणराजाने तालुक्‍याकडे पाठ फिरवली होती, त्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: जळून गेला आहे. त्यातच परतीच्या पावसाचीही लक्षणे दिसत नव्हती, त्यात भर म्हणून परिसरात हुमणी किडीमुळे पिके धोक्‍यात आली होती. त्यातच मध्यरात्री झालेल्या पावसामुळे हुमणी व पाऊस अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे परिसरातील शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावर सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते.ओढे नाले भरून वाहत होते. शेतात ज्यादा झालेले पाणी शेतकऱ्यांनी पाट चाऱ्याना सोडल्यामुळे बारामती कळंब रस्त्यावरील चिखली नजीकच्या ओढ्यावरुन पाणी वाहत होते. तरी रब्बीच्या पेरणीसाठी आणखी पावसाची आवश्‍यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

  • गेल्यावर्षी 633 मिमीची नोंद
    कुरवलीसह इतर परिसरात रात्री झालेल्या पावसाची 24 मिमी नोंद झाली असून चालू वर्षी आत्तापर्यंत 239 मिमी पावसाची नोंद झाली असली तरी मागील वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत 633 मिमी पावसाची नोंद झाली होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)