कुरवलीतील डीपीसह फ्यूज पेटीची दयनीय अवस्था

  • अपघाचा धोका : आजूबाजूला वाढले गवत

कुरवली – इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदी लगत असलेल्या कुरवली गावातील महावितरणच्या डीपीसह फ्यूज पेटीची दयनीय अवस्था असल्यामुळे अचानक वीज गायब होत आहे. तर फ्यूज पेटीत फ्यूज नसून थेट वायर जोडल्या असल्याने दुरुस्तीला जाणाराचा जीवही जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अनेकदा वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण रात्रीच्यावेळी असते. अशावेळी महावितरणचे कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील नागरिकांना जीव धोक्‍यात घालून फ्यूज जोडणी करावी लागत आहे.
कुरवली-सणसर रस्त्यावरील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेच्या स्वच्छतागृहा लगत एक डीपी अससून या डीपीसह फ्यूज पेटीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच या डीपीच्या जवळ शाळा असून शाळेतील विद्यार्थी या रोहित्राच्या बाजूने ये – जा करित असतात त्यातच एखाची दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. किमान शाळा परिसरातील रोहित्राच्या बाजूस सरक्षंण कुंपण घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावात व वाडी वस्तीमध्ये एकूण चार सिंगल फेज रोहित्र आहेत. सर्व ठिकाणी फ्यूजच गायब असल्याचे चित्र आहे. तसेच या डीपीच्या बाजूला झाडे झुडुपे व गवत देखील वाढले आहे. गावात अनेक ठिकाणी विजेचे खांबावरील ताराची उंची कमी आहे. लासुर्णे व सणसर रस्ता गावामधून जात असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे वाहनांमुळे अपघाताचे प्रसंग घडले आहेत, तरी येथील विजेच्या तारांची उंची वाढवावी व गावातील डीपीची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

दोन-तीन दिवसांत प्रत्यक्ष पहाणी करून नवीन डीपी व फ्यूज बसविण्यात येतील.
– एम. जी. चौगुले, कनिष्ठ अभियंता, घोलपवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)