कुरवलीकरांचे आरोग्य सांडपाण्याने धोक्‍यात

कुरवली -कुरवली येथील सोमेश्‍वर मंगल कार्यालय जवळ गावातील सांडपाणी उघड्यावर सोडल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असल्याने परिसरातील वस्तीत नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ग्रामपंचायतीने सांडपाणी सोड्याण्यासाठी गावांतगर्त सिमेंट पाइपलाइनच्या माध्यमातून सांडपाणी गावाबाहेर रस्त्यालगत चारीत उघड्यावर सोडल्याने गावालगत असणाऱ्या लोकवस्तीच्या नागरिकांसह रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य या दुर्गंधीमुळे धोक्‍यात आले आहे. थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे, तोपर्यंत जर येथे उपाययोजना राबविली गेली नाही तर या दुर्गंधी सोबतच इतर आजारांनी नागरिक त्रस्त होणार आहे, तरी हे सांडपाणी बंद गटरीद्वारे वाहून जाईल अशी व्यवस्था ग्रामपंचायतीने पासाळ्यापूर्वी करावी अशी मागणी जोर धरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)