कुरळी ग्रामसभेत विविध कामांचा आढावा

चिंबळी- कुरूळी (ता. खेड) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चंद्रकांत बधाले यांच्या अध्यक्षस्थेखाली आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत मागील सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून करवसूली करणे, वैयक्तिक शौचालय बांधकाम करून गाव हागणदारी मुक्त करणे. आपले सरकार केद्रांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती देणे, मुलगी वाचवा अभियान राबविणे, नरेगा कामाबाबत ग्रामस्थांना माहिती देणे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतंर्गत दवाखान्यामध्ये प्रस्तुतीबाबत जनजागृती करणे, पंतप्रधान आवाज योजना व रमाई आवाज योजना अतंर्गत घरकुल बांधकाम आढावा घेणे, घरकुल बांधकाम पुर्ण करणे, 14 वा विक्त आयोग कामाचा आढावा घेणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शातांराम सोनवणे पंचायत समितीचे सदस्य अमर काबंळे, उपसंरपच अमित मुऱ्हे, अनिल बागडे, ग्रामपंचायत सदस्य आशिष मुऱ्हे, बाळासाहेब सोनवणे, सचिन कड, विजय काबंळे, शरद मुऱ्हे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष एम. के. सोनवणे, शातांराम घाडगे, गुलाब सोनवणे, माजी ग्रा.पं. सदस्य सागर मुऱ्हे, काळूराम कड, रमेश बागडे, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकात सोनवणे, ग्रा.प.सदस्या विद्या बागडे, शुभ्रद्रा सोनवणे, प्रज्ञा गुरव, अनिता बधाले, नगिना मेदनकर, शुंभागी काबंळे, पोलिसपाटील प्रतिभा काबंळे, माजी उपसंरपच एकनाथ सोनवणे, हेमंत काळडोके, सुरेश गायकवाड, पाडूरंग गुरव, नाना जैद, नवनाथ मेमाणे उपस्थित होते. प्रास्ताविक जि. प. प्राथमिक केंद्र शाळेच्या वर्गशिक्षिका अनिता शिंदे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)