कुरकुंभ येथे श्री फिरंगाई क्रीडा महोत्सव उत्साहात सुरू

कुरकुंभ- कुरकुंभ (ता. दौंड) येथील श्री फिरंगाईमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व अल्काईल अमाईन्स केमिकल लि. यांच्या विद्यमाने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी व पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले. यंदाच्या महोत्सवाचे हे पाचवे वर्षे आहे. दौंड तालुक्‍यातील साधारण साठ विद्यार्थी महोत्सवात सहभागी झाले आहेत. सलग तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. यावेळी सरपंच राहुल भोसले, सदस्य विनोद शितोळे, पोलीस पाटील रेश्‍मा शितोळे, माजी सरपंच रशिद मुलाणी, माजी उपसरपंच सुनिल पवार, अल्काईल अमाईन्स कंपनीचे महाव्यवस्थापक कावळे, मॅनेजर खाडे, क्रीडा शिक्षक पी. जी. हगारे, पर्यवेक्षक सिकंदर शेख, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य नानासाहेब भापकर व सूत्रसंचालन एस. आर. शितोळे यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना उत्कर्ष शिक्षण संस्थेचे सचिव कचरदास उदावंत, संचालक रंगनाथ शितोळे, यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

  • यशस्वी खेळाडू व संघ खालीलप्रमाणे-
    खो खो – 14 वर्ष मुले – प्रथम – श्रीराम विद्यालय पडवी, द्वितीय – फिरंगाई माता विद्यालय कुरकुंभ, तृतीय – जि. प.प्राथमिक शाळा,धायगुडे वाडी. 14 वर्ष मुली – प्रथम – फिरंगाईमाता विद्यालय कुरकुंभ, द्वितीय – सरस्वती विद्यालय रावणगाव, तृतीय- गुरुकृपा विद्यालय वासुंदे. 17 वर्ष मुले – प्रथम – फिरंगाईमाता विद्यालय कुरकुंभ, द्वितीय – श्रीराम विद्यालय पडवी, तृतीय – सरस्वती विद्यालय रावणगाव. 17 वर्ष मुली – प्रथम – श्रीराम विद्यालय पडवी, द्वितीय – श्री फिरंगाई माता विद्यालय कुरकुंभ, तृतीय – सरस्वती विद्यालय रावणगाव.
    कबड्डी – 14 वर्ष मुले – प्रथम क्रमांक भैरवनाथ विद्यालय खोर, द्वितीय – नवीन माध्य. विद्यालय मळद, तृतीय – गुरुकृपा विद्यालय वासुंदे, 14 वर्ष मुली – प्रथम- रोकडोबा नाथ विद्यालय भांडगाव, द्वितीय – गुरुकृपा विद्यालय वासुंदे, तृतीय – जि. प. प्राथमिक शाळा वाळकी, 17 वर्ष मुले – प्रथम – रोकडोबा नाथ विद्यालय भांडगाव, द्वितीय – भैरवनाथ वि.गिरीम, तृतीय – फिरंगाई माता विद्यालय कुरकुंभ, 17 वर्ष मुली – प्रथम – भैरवनाथ वि. खुटबाव द्वितीय, रोकडोबा नाथ वि. भांडगाव, तृतीय – नाथनगर विद्यालय बोरीपार्धी.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)