कुरकुंभ येथे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची गैरसोय

कुरकुंभ- कुरकुंभ (ता. दौंड) येथून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर दिवाळीच्या सणासुदीच्या सुट्टीवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली दिसत आहे. पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने प्रत्येक गावाच्या मुख्य चौकात पूल उभारल्याने महामार्गावरील वाहन भरधाव वेगाने पुढे जाते. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांची एसटी देखील आता अन्य वाहनाप्रमाणे अडथळा नको म्हणून या पुलावरून भरधाव वेगाने जाताना दिसत आहे.दिवाळीच्या सुटीत बरेच नागरिक, विद्यार्थी, कुरकुंभ येथील बाहेर गावचे कामगार आपल्या गावी जाण्यासाठी एसटी बसचा प्रवास करीत असतात. मात्र, आज पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी त्या मार्गानेच भरून येत असल्याने येथील प्रवाशांची नाराजी झाली. परिणामी येथील प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करताना दिसत होते, त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. आज (दि. 5) दिवसभर भर उन्हात ताटकळत प्रवासी या महामार्गावर थांबले होते; पण एसटी थांबली नाही. त्यामुळे खासगी वाहनाला हात करून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. मात्र, नंतरच्या टप्प्यात प्रवाशांना रस्त्यावर थोडे पुढे जात एसटी थांबवली आणि दाटीवाटीने एसटी बसमध्ये शिरत प्रवास करताना दिसत होते. काही प्रवाशांच्या चेहऱ्यावर “वाट पाहीन; पण एसटीनेच जाईल’, अशा भावना दिसत होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)