कुरकुंभ येथे प्लॅस्टिक बंदीचा आठवडे बाजारावर परिणाम

कुरकुंभ – महाराष्ट्र राज्यभर सर्वत्र प्लॅस्टिक बंदी लागू झाली असल्याने ग्रामीण भागात देखील व्यावसायिक आणि आठवडे बाजारामध्ये ग्राहकांनी प्लॅस्टिक पिशव्या टाळल्याने अडचणींचा सामना करावा लागला. याचेच चित्र कुरकुंभ (ता.दौंड) येथील आठवडे बाजारात पाहायला मिळाले. छोट्या व्यवसायकांनी या निर्णयाबाबतीत नापसंती तर मोठ्या व्यवसायकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. गुरुवारी कुरकुंभचा आठवडे बाजार त्यातच प्लॅस्टिक बंदी असल्याने पालेभाज्यासह अन्य वस्तू घरी न्यायच्या कशा? असा प्रश्न ग्राहकांना पडत होता. चहाचा छोटा स्टॉल असल्यास कागदी ग्लास परवडत नसल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले. बेकरी व्यवसायकानाही प्लॅस्टिक पिशवीअभावी खारी, टोस्ट, बिस्कीटची विक्री कमी प्रमाणात झाली असल्याचे सांगितले. भेळ व्यवसायकानाही याच पद्धतीने सामना करावा लागला. याचबरोबर ग्रामीण भागात किराणा आणि भुसार माल विक्री धारकांनी प्लॅस्टिक बंदीचे स्वागत केले आहे. ग्राहकांना हळूहळू सवय होईल, अशी दबक्‍या आवाजात व्यवसायकांमध्ये चर्चा होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)