कुरकुंभ येथे दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

file photo

कुरकुंभ- कुरकुंभ येथील स्मशानभूमीसमोर दुचाकीच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे. जखमीला दौंड येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संभाजी किसन पवार (वय 58, रा. कुरकुंभ ता. दौंड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ कांतीलाल साळुंके (वय 32, रा. कुरकुंभ) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत दुचाकीचालक सचिन मारूती दुधे (रा. मळद ता. दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कुरकुंभ (ता. दौंड) येथील स्मशान भूमीसमोरील सेवा रस्त्याने संभाजी पवार कुरकुंभहून साळुंकेवस्तीच्या दिशेने रात्रीच्या सुमारास पायी जात होते. यादरम्यान सचिन दुधे हे (एम. एच. 42 ए. ई. 1937) दुचाकीवरून मळदहून कुरकुंभकडे निघाले होते. यावेळी त्याच्या दुचाकीची जबर धडक संभाजी पवार यांना लागली. यामध्ये पवार यांना जबरदस्त मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला व दुचाकीचालक सचिन दुधे यांच्या तोंडाला, पायाला, दुखापत झाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कुरकुंभ पोलीस मदत केंद्राचे हवालदार के. बी. शिंदे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)