कुरकुंभ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वरवंड – कुरकुंभ (ता.दौंड) येथे बुधवारी (दि.9) सिप्ला फौंडेशन च्यावतीने सन 2016-17 या शैक्षणिक वर्षांत श्री फिरंगाईमाता विद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावी मधील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षांत श्री फिरंगाईमाता विद्यालयातील शासनाने घेतलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा सिप्ला फौंडेशन च्यावतीने प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. यात दहावीत प्रथम क्रमांक कोमल विलास बारवकर, द्वितीय क्रमांक कु.आरती जगदीश बनकर, तृतीय क्रमांक घनश्‍याम झाडे यांनी पटकाविला आहे. तर बारावीमधील प्रथम क्रमांक कु.जान्हवी नवनाथ झाडे, द्वितीय क्रमांक स्वप्निल तानाजी जाधव आणि तृतीय क्रमांक पल्लवी गरगडे यांना मिळविला असून त्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक रुपये 5000, द्वितीय क्रमांक रुपये 4000 आणि तृतीय क्रमांक रूपये 3000 रोख बक्षीस व प्रमाणपत्र सिप्ला फौंडेशनचे अधिकारी वाघमारे आणि सौदागर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांसह गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा यशस्वीतेचा आलेख सांगून मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)