कुरकुंभ औद्योगिक वसाहत झाली “स्फोटक’

रस्त्यावर उभे असलेले ट्रक गॅस, केमिकलने भरलेल्या सिलेंडरचे

कुरकुंभ- कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये काही कंपन्यांनसमोर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने उभी केली जात आहेत. यामध्ये काही हायड्रोजन गॅसचे ट्रक, तर काही विविध प्रकारचे केमिकलने भरलेले टॅंकर, टेम्पो कंटेनर, तसेच विविध प्रकारची वाहने रस्त्यावर उभे केलेले दिसतात रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे, यावर उपाय म्हणून एमआयडीसीने रीतसर नोटीस पाठवून, तसेच कुरकुंभ पोलीस स्टेशनला पत्र देऊन यांच्यावर कारवाईचे संकेत दिले असताना देखील सर्रास वाहने रस्त्यावर वेडीवाकडी लावलेली असतात.
या औद्योगिक वसाहतीत बहुतांश केमिकल कंपन्या असल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे केमिकल,पावडर, औषधे, कच्चा माल, तसेच काही अवजड वस्तू यांची आवक जावक होत असते. बाहेर ठिकाणाहून अवजड माल घेऊन आलेली वाहने बऱ्याच वेळ औद्यगिक वसाहतीतील काही कंपन्यांच्या बाहेर रस्त्यावरच उभी असतात. त्याच रस्त्याने दुसऱ्या वाहनांना जाण्यासाठी मार्ग कमी प्रमाणात मोकळा असल्याने अशा उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी या गाड्यांचा अंदाज न आल्याने अनेक कामगारांचे या रस्त्यावर छोटे मोठे अपघात झाले आहे. हे टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. याचबरोबर येथे कामगारांची संख्या जास्त असुन त्यातच शिफ्टमध्ये काम असल्याने दुचाकी गाड्या ही कंपनीच्या बाहेर अत्याव्यस्थ उभ्या असतात.त्यामुळे अशा राजरोजपणे रस्त्याच्या कडेला धोकादायकपणे उभ्या असलेल्या वाहनांवर, कारवाई केली जावी अशी मागणी येथील वाहनचालक तसेच कामगार करीत आहेत.

  • कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली असता,विविध कंपन्यांमध्ये येणारे ट्रक हे वेड्या वाकड्या पध्दतीने उभे असल्याचे आढळून आले आहेत,आमच्या पातळीवर ट्रक चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे तसेच यासंबधी कुरकुंभ पोलीस स्टेशनला कारवाई करण्या संदर्भात लेखी पत्र देखील दिले आहे.
    – मिलिंद पाटील, उपअभियंता एमआयडीसी, कुरकुंभ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)