कुरकुंभमध्ये साथीच्या रुग्णांमध्ये वाढ

कुरकुंभ- येथील परिसरात सध्या डेंग्यूसदृश्‍य तसेच चिकुनगुणिया या आजारांसह थंडी, ताप, खोकला या आजारांना पुन्हा एकदा सुरवात झाली असून, येथील रुग्ण खाजगी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत आहेत. मागील दोन महिन्यांत या भागात डेंग्युसदृश्‍य रुग्णांची संख्या जास्त होती. त्यातील बहुतांश रुग्णांना उपचार करून सोडून देण्यात आले होते. मात्र, या साथीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या आठवड्यात डेंग्युसदृश्‍याचे दोन ते तीन,चिकुनगुणियाचे चार ते पाच, गोचीड तापाचे तीन रुग्ण आढळून आल्याची माहिती कुरकुंभ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाखरे यांनी सांगितले.
व्हायरल फिवरची लागण अनेक रुग्णांना झाली असून पांढऱ्या पेशींची संख्या कमी होणे, प्लेटलेट्‌स कमी-जास्त होणे, ताप येणे, हात पाय दुखणे, डोके दुखणे अशी लक्षणे असणारे रुग्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत.सध्या कुरकुंभ तसेच आजुबाजूच्या परीसरात पाण्यामुळे होणाऱ्या आजारातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी कुरकुंभ गावात तसेच वाड्या-वस्त्यांवर जाऊन डेंग्यूविषयी, तसेच साथीच्या आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत. आपल्या घरामध्ये आणि परीसरात स्वछता कशी असावी तसेच या आजाराची लक्षणे काय आहेत, कोणती दक्षता घेणे आवश्‍यक आहे. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी, चौकातील हॉटेल या ठिकाणी माहितीचे फलक प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंभ यांच्या मार्फत लावण्यात आले आहेत.

  • मागील दोन महिन्यांत डेंग्यूचे रुग्ण शहरात आढळून आल्याने दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतीतर्फे औषध फवारणी करण्यात येत आहे. गावातील ओढ्यात दुर्गंधी पसरली होती, त्या ओढ्याच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. नागरिकांनी देखील आपला परीसर स्वछ ठेवून योग्य ती काळजी घ्यावी.
    राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)