कुरकुंभमधील कंपनीत भूमिपुत्रांना रोजगार द्या

कंपनीवाले बऱ्याच वेळा स्थानिक असल्याने स्थानिक तरुणांना कामावर घेत नाहीत. घेतले तरी कमी दर्जाची वागणूक देतात. असे न होता कुरकुंभ पांढरेवाडी येथील स्थानिक सुशिक्षित तरुणांना एमआयडीसीमध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. यासाठी स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी कायम मोठा लढा उभारला जाईल.
– राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ.

स्थानिकांची निवेदनव्दारे कुरकुंभ एमआयडीसीतील कंपन्यांकडे मागणी

कुरकुंभ – दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ, पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरीता येथील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. शासनाच्या नियमानुसार कंपनीच्या आस्थापनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारावर प्रथम प्राधान्य हा स्थानिक बेरोजगारांना मिळणे आवश्‍यक आहे. परंतु कुरकुंभ एमआयडीसी येथील परप्रांतीयांना पहिले प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही प्रदुषणासाठी बहुचर्चित आहे. गेली वीस-पंचवीस वर्षांपासून औद्योगिक वसाहतीचे प्रदूषण ग्रामस्थ सहन करीत आहेत. अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाही प्रदूषणाची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने बहुतांश स्थानिक शेतकरी याचा त्रास सहन करीत याच ठिकाणी राहत आहेत. कित्येकांची जमीन वसाहतीतील कंपन्यांना गेल्या आहेत. अशा स्थितीतही स्थानिकांना प्राधान्य दिले जात नसल्याने वसाहतविषयी उच्चशिक्षित तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना देखील येथील स्थानिक तरुणांना कमी दर्जाची वागणूक येथील कंपन्यांकडून दिली जात असल्याचा दावा येथील बेरोजगार करीत आहेत. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्या स्थानिक तरुणांना रोजगाराकरीता प्राधान्य देत नसल्याने परिसरात बेरोजगार तरुनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

कुरकुंभ आणि पांढरेवाडी परिसरातील युवक सुशिक्षित आणि उच्चशिक्षित आहेत. आशावेळी पात्रता असूनही नोकरीसाठी केलेला अर्जाची साधी दखलही कंपन्यांकडून घेतली जात नाही. संबंधित युवक कंपनीच्या गेटवर विचारणा करण्यासाठी गेल्यास किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेटल्यावर त्यांना कमी दर्जाची वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. गावामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. शिक्षण घेऊन देखील रोजगार मिळत नसल्याने तरुण वाईट मार्गाचा अवलंब करीत आहेत. याच प्रश्नावर विचार करून येथील स्थानिक तरुण स्वतः एमआयडीसीमधील प्रत्येक कंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता प्रत्येक कंपनीत जाऊन स्थानिकांना रोजगार मिळवा असे पत्र, अर्ज प्रत्येक कंपनीला देण्यात आले आहे. सर्व तरुण एकत्र येऊन या लढ्याला यश मिळेल, अशी अपेक्षा येथील तरुण करीत आहेत. गेली कित्येक वर्षांपासून आम्हाला या कंपन्यांनी कमी दर्जाची वागणूक दिली जाते. पण आता आम्हाला न्याय हवा यामुळे आम्ही सर्व तरुण या प्रत्येक कंपनीना अर्ज देत आहोत, असे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)