कुरकुंडी सोसायटीवर अपक्षांचे वर्चस्व

भामा आसखेड – खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील कुरकुंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. साबळे यांनी जाहीर केला. यामध्ये अपक्षांनी बाजी मारत 7 जागांवर विजय मिळविला.
कुरकुंडी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 27 ऑगस्टला मतदान झाले. एकूण 13 जागांपैकी भटक्‍या जमातीच्या राखीव जागेसाठी कोणाचाही अर्ज न आल्याने 12 जागांसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये अपक्षांनी बाजी मारत 7 जागांवर विजय मिळविला. अपक्ष उमेदवार चिंधु भोकसे, दत्ता भोकसे, विठ्‌ठ्‌ल भोकसे, उल्हास भोकसे, काळुराम ढोरे, शिवाजी भोकसे हे सर्व साधारण जागेसाठी निवडून आले. इतर मागास प्रवर्गातून अपक्ष उमेदवार संजय भोकसे हे विजयी झाले. तर मुक्ताईदेवी शेतकरी विकास पॅनेलचे सर्व साधारण पुरुष जागेसाठी रोहिदास आवळे, दत्तात्रय भोकसे, महिला राखीव जागेसाठी नंदा काळे, गऊबाई भोकसे, अनुसुचित जाती जमाती जागेसाठी प्रकाश वाघमाने असे पाच उमेदवार विजयी झाले. यावेळी सरपंच युवराज पडवळ, शांताराम आवळे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक भोकसे, सचिव समिर कोळेकर, नितीन भोकसे, संभाजी राळे, उत्तम पडवळ, शिवाजी भोकसे, बजरंग भोकसे, दत्तु काळे, धर्मनाथ काळे, किशोर कुबडे, महेंद्र पडवळ, रामदास भोकसे, अरुण भोकसे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)