कुमार सानूनेही दत्तक घेतली मुलगी 

90 च्या दशकामध्ये आपल्या रोमॅंटिक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कुमार सानू यांने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्यापैकी गोपनीयता बाळगली आहे. गॉसिप फॅक्‍टरी सुरू होऊ नये, यासाठी त्याने ही खबरदारी घेतली आहे. मात्र कुमार सानूने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. 2001 मध्ये त्याने एका मुलीला दत्तक घेतले आहे. मात्र ही बाब त्याने मिडीयावाल्यांपासून जरा लपवूनच ठेवली. त्याचे कारणही त्याने सांगितले. आपल्याबद्दल आणि आपल्या मुलीबद्दल समाजामध्ये विनाकारण चर्चा व्हायची भीती वाटल्यानेच आपण ही बाब लपवून ठेवली असे त्याने सांगितले. शेनन असे या मुलीचे नाव आहे आणि ती आता केवळ 16 वर्षांची आहे.
आपल्याला आपल्या मुलीचा सार्थ अभिमान वाटतो आहे, असे कुमार सानूने सांगितले. कारण शेनन ही देखील कुमार सानूप्रमाणेच गायिका आहे. फक्‍त फरक एवढाच की ती बॉलिवूडमध्ये नव्हे, तर हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ती सध्या इंग्लंडमध्येच असते आणि तिथल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिंगर म्हणून लोकप्रिय झाली आहे. तिच्यामुळेच आपली हॉलिवूडमध्ये प्रसिद्धी झाली आहे, असे कुमार सानूने सांगितले. तिच्यासाठी बॉलिवूडची म्युजिक इंडस्ट्री किती महत्वाची आहे माहित नाही, पण कुमार सानूने आपल्या मुलीला आपल्यापुढे एक पाऊल टाकून सुरुवात करून दिली आहे, असे मात्र नक्की म्हणावेसे वाटते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)