कुमार विश्‍वास यांनी साधला केजरीवालांवर निशाणा

नवी दिल्ली – पत्रकार आशुतोष यांच्या पाठोपाठ आशिष खेतान यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर याच पक्षाचे दुसरे एक बंडखोर नेते कुमार विश्‍वास यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवालांचे राजकारण संकुचीत स्वरूपाचे होत चालले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

केजरीवालांना लक्ष्य करीत त्यांनी एक कविताच ट्‌विट केली असून त्यांनी केजरीवालांना खुज्या लोकांचा दरबार भरवून नेमके काय साधले असा सवाल त्यांना केला आहे. जो शिलालेख बनता था उसको अखबार बनाकर क्‍या पाया? असाही सवाल त्यांनी या कवितेत केजरीवालांना उद्देशून केला आहे.

याच अनुषंगाने त्यांनी दुसरे एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, हम तो चंद्र गुप्त बनाने निकले थे, हमे क्‍या पता था चॅंदा गुप्ता बन जाएगा?. कुमार विश्‍वास हे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानेच केजरीवालांच्या कारभारावर जाहीरपणे टिका करीत आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)