नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे नुकताच घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच विश्वास यांनी जेटलींना एक पत्र लिहून पूर्ण प्रकरणावर स्वतःची भूमिका मांडून खेद व्यक्त केला होता. याच पत्राच्या आधारावर जेटलींनी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वास यांनी जेटलींना लिहिलेल्या पत्रात स्वतःच्या विधानांसाठी माफी मागत खटला मागे घेण्याची विनंती केली. आम्ही विश्वास यांचा माफीनामा स्वीकारल्याची माहिती जेटलींच्या वकिलाने दिली. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच आपण, पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनी आणि प्रवक्त्यांनी त्यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला होता. आता अरविंद केजरीवाल माझ्या संपर्कात नाही, असत्य बोलून ते स्वतः गायब झाले असल्याचा आरोप विश्वास यांनी पत्रात केला आहे. विश्वास यांनी पत्रात केजरीवालांच्या विरोधात अनेक दावे केले आहेत.

केजरीवालांना खोटं बोलण्याची सवय असून पक्ष कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या विधानांचा पुनरुच्चार केला होता, असे त्यांनी पत्रात नमूद केले. अब्रू नुकसानीच्या खटल्यात केजरीवालांसमवेत अन्य उर्वरित आरोपींनी तत्पूर्वीच माफी मागितली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)