कुमारस्वामींच्या पत्नीचा इंटरनेटवर जोरदार सर्च

कर्नाटक मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या कुमारस्वामी यांची पत्नी राधिका कुमारस्वामी यांच्या नावाने इंटरनेटवर जोरदार सर्च व्हायला लागला आहे. राधिका कुमारस्वामी या अभिनेत्री आहे. तिने प्रोड्यूसर म्हणून देखील काम केले आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मोठा चेहरा आहे. एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत 2006 मध्ये विवाह केल्यानंतर ती चर्चेत आली होती. दोघांना एक मुलगी देखील आहे जिचे नाव शमिका आहे.

कर्नाटक निवडणुकीनंतर राधिका कुमारस्वामी देखील गुगलवर ट्रेंड करत आहे. अनेक लोक राधिका बद्दल जाणून घ्यायला उत्सूक आहेत. वयाच्या 14 व्या वर्षी राधिकाने “नीला मेघा शमा’ नावाच्या कन्नड चित्रपटामध्ये काम केले. त्यानंतर नायिका म्हणून तिचा पहिला सिनेमा 2002 साली रिलीज झाला होता. “नीनागागी’ नावाच्या या कन्नड सिनेमामध्ये तिच्याबरोबर विजय राघवेंद्र हे दक्षिणात्य अभिनेते नायक होते. हा सिनेमा हिट झाला आणि त्या वर्षात त्याने सर्वाधिक कमाईही केली होती. मात्र राधिकाचे फिल्मी करिअर फार काळ टिकले नाही. 2003 मध्ये तिच्या ऍक्‍टिंग करिअरला घरघर लागली. तिच्या एकापाठोपाठ 5 कन्नड सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर फ्लॉप शिक्का बसला. प्रेक्षकांबरोबर टीकाकारांनीही तिच्या करिअर ग्राफवर टीका केली होती. त्यानंतर तिने ऍक्‍टिंग सोडूनच दिली.

राधिकाचा पहिला विवाह रतन कुमार सोबत झाला होता. त्या दरम्यान राधिकाच्या आईने आरोप केला होता की रतनने जबरदस्ती विवाह केला होता. राधिका तेव्हा फक्त 14 वर्षांची होती. राधिकाला जिवंत जाळण्याचा देखील रतनने प्रयत्न केल्याचा आरोप पित्याने केला होता. रतन कुमारचे 2002 मध्ये हर्ट ऍटॅकने निधन झाले. लाईमलाईटपासून राधिका काही वर्ष दूर होती. 2010 मध्ये एचडी कुमारस्वामी सोबत विवाहाचा दावा तिने केला. 2006 मध्ये राधिकाचा विवाह झाला. या सगळ्या घडामोडींदरम्यान फिल्मी करिअरबरोबर राजकीय करिअरचा आणखी एक वारसा कर्नाटकमध्ये सुरू होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र कुमारस्वामी यांच्याबरोबरचे वैवाहिक आयुष्य अद्याप प्रकाशात आलेले नाही. मात्र वाचकांना अभिनेत्री राधिका कुमारस्वामीबद्दलच जाणून घ्यायची विशेष ईच्छा असल्यानेच तिच्या नावे जोरदार सर्च व्हायला लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)